Who's Online

We have 90 guests and no members online

Download Newsletter

Professionals and Industrialists

वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक व सांगलीतील नामवंत आर्किटेक्ट व इंजिनिअर श्री. आनंदराव साळुंखे हे शिल्प चिंतामणी सोसायटीत रहात असून त्यांनी ज्ञानदीप बंगल्याचे डिझाईन केले आहे. ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या ज्ञानदीप बंगल्याचे रेखीव सौंदर्य व सुदृढ स्थिती त्यांच्या कल्पकतेची व प्रविण्याची साक्ष देतात. त्यांनी शिल्प चिंतामणी सोसायटीत कम्युनिटी हॉल बांधून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सध्या आजारी असूनही त्यांनी ज्ञानदीपमध्ये येऊन आपल्या अध्यात्मिक अधिष्ठानाचे व साधुसंतांच्या स्मृतीभवनांचे शिल्प साकारताना आलेले अनुभव व्यक्त केले. त्यांचे सामाजिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य स्पृहणीय आहे.

Page 4 of 8