Who's Online

We have 149 guests and no members online

Download Newsletter

About Us

ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन , सांगली ही सार्वजनिक विश्वस्त संस्था २००५ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा ( १९५०) अन्वये नोंदणी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक ई-१५३०/सांगली हा आहे.
उद्दिष्टे-

१) माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून लोकशिक्षण, विज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मिती करणे.
२) भाषा, धर्म, स्थान यामुळे निर्माण होणार्‍या अडथळयांना पार करून ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे. वेबसाईट व संगणक प्रणाली विकसित करणे व त्यातून भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे.
३) इंटरनेटवर मिळणाऱ्या ज्ञानाचा स्रोत वापरून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञान वितरित करणाऱ्या व्यक्तींचे संघटन करणे व अशी ज्ञानप्रसार केंद्रे उभारणे.
४) माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शाळा, महाविद्यालय व संशोधन प्रयोगशाळा, तसेच ग्रंथालय उभारणे व शैक्षणिक पोर्टल वेबसाईट तयार करणे.
५) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांशी विविध विषयावरील दूरस्थ शिक्षणासाठी सहकार्य करणे.
६) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती देण्यासाठी परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शने आयोजित करणेतसेच जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
७) परदेशात राहणाऱ्या भारतीयांपर्यत येथील साहित्य व संस्कृती पोहोचविणे व त्यांच्याकडून भारताच्या प्रगतीसाठी साहाय्य मिळविणे.
८) माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतास सशक्त राष्ट्र बनविणे आणि जागतिक मानवकल्याणासाठी ज्ञानप्रसार करण्यात भारताला अग्रेसर करणे.
९) वरील उद्दिष्टांस पूरक ठरतील असे अन्य कार्यक्रम घेणे वा त्यात सहभागी होणे.