Who's Online

We have 85 guests and no members online

Download Newsletter

सिस्टेड फौंडेशनमध्ये अमृत बंग यांची मुलाखत

स्वयंसेवी संस्थांनी समाजकार्यासाठी निधी स्वीकारताना आपल्या ध्येयाशी कोणतीही तडजोड करता कामा नये. कोणत्याही कामासाठी आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे देणगीदार आणि स्वयंसेवी संस्था समान भागीदाराच्या भूमिकेत असतात, असे मत सामाजिक कार्यकर्ते अमृत बंग यांनी व्यक्‍त केले.

श्री. बंग गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या आरोग्य सुधारणांसाठी 'सर्च' संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांचे सुपुत्र आहेत. येथील सिस्टेड फाउंडेशनच्यावतीने युवा नेतृत्व आणि नवशोधन-सृजनशीलता यासंबंधी त्यांनी आपले विचार मांडले. त्यांची मुलाखत फाउंडेशनचे विश्‍वस्त डॉ. सुहास खांबे आणि 'सकाळ'चे बातमीदार जयसिंग कुंभार यांनी घेतली.

यावेळी त्यांनी स्वयंसेवी सेवा कार्यात येण्यासाठी तरुणांना आवाहन केले आणि निर्माण या युवा नेतृत्व विकासाच्या उपक्रमांची माहिती दिली.''

यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. दिलीप पटवर्धन, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रविंद्र व्होरा, 'पीव्हीपीआयटी'चे प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, आरआयटी इनोव्हेशन सेंटरचे डॉ. सुधीर अरळी आणि हर्षल पाटील, ज्ञानदीप फाउंडेशनचे डॉ. एस. व्ही. रानडे, प्रा. उदय रानडे, डॉ.योगेश जुमराणी, निसर्ग प्रतिष्ठानच्या डॉ. देवयानी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रा. भालबा केळकर यांनी अमृत बंग यांना संस्थेचे 'नवशोधन मंत्र आणि तंत्र' हे पुस्तक भेट दिले.

भाग - 1

भाग - 2

भाग -3