Who's Online

We have 24 guests and no members online

Download Newsletter

निसर्ग प्रतिष्ठान

निसर्ग प्रतिष्ठानची औपचारिक स्थापना १९८९ मध्ये झाली . त्या आधी १९७८ मध्ये शहरातील काही निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन निसर्गाशी संबधित संस्था व शासकीय वनखाते यांना सहकार्य करण्यास सुरूवात केली होती. पर्यावरणदिन, वनदिन, निसर्ग प्रदर्शने, स्लाईड शो, व्याख्याने, निसर्गअभ्यास सहलीचे आयोजन करून त्यांनी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यास सुरूवात केली.

निसर्गप्रेमींच्या प्रयत्नाने १९८२ साली मायणी (ता. खटाव, जि. सातारा ) येथे पक्षी-अभयारण्य घोषित करण्यात आले. सांगली शहरातील रिमांड होम परिसरातील एक एकर जमिनीमध्ये सामाजिक वनीकरणाचा जिल्ह्यातील पहिला निसर्गप्रेमींनी राबविला. १९८४ साली सांगली शहरातून जिल्ह्यातील पहिली वृक्षदिंडी काढली. या वृक्षदिंडीच्या निमित्ताने `पर्यावरण आणि आपलं जीवन' हे महाराष्ट्रातील मुंबईबाहेर निसर्ग संमेलन भरविण्याचा मान निसर्गप्रेमींना मिळाला. या संमेलनासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभले होते. प्रतिष्ठानची स्थापना हेाण्यापूर्वी निसर्गप्रेमींनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने राष्ट्नीय पर्यावरण जागृती मोहिमेचे संयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. हे संमेलन १९८६ साली भरले होते.


निसर्ग प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर - पुण्याच्या वनराईचे अध्यक्ष श्री. मोहन धारीया, श्री पार्श्वनाथ को-ऑप. बँकेचे अर्थसहाय्य व डॉ. श्री. सोहोनी यांच्या प्रोत्साहन व प्रेरणेतून निसर्ग प्रतिष्ठानचे १९८९ मध्ये एका नोंदणीकृत ट्रस्टमध्ये रूपांतर झाले. प्रतिष्ठानने पर्यावरण रक्षणासाठी विविध कार्यक्रम आखले आहेत. त्यांची थोडक्यात माहीती -
पर्यावरणाविषयी जागृती मोहिमा - ली पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठानने समाजाच्या तळागाळात जाऊन मोहिम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. साक्षरता वर्गात जाऊन लोकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले आहे. खेड्यापाड्यातील शाळामध्ये जाऊन व्याख्याने, प्रदर्शने आयोजित केली आहेत. वृक्षदिंडीचे आयोजन करण्याची कल्पना प्रतिष्ठानने मांडली. याला मान्यता मिळून आता संपूर्ण जिल्ह्यात वृक्षदिंडीचे आयोजन केले जाते. विविध विषयांवर प्रर्दशने भरवून पर्यावरण जागृती करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करते.


पर्यावरण शास्त्र संस्थेची स्थापना - ली पर्यावरण जागृती करण्यासाठी समाजातील एक विशिष्ठ वर्ग नजरेसमोर ठेवून प्रतिष्ठानने प्रशिक्षण वर्ग चालविण्यासाठी Institute of Environmental Studies १९९० मध्ये स्थापन केली. या संस्थेमार्फत दोन प्रकारचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात.

१) पर्यावरण शास्त्रातील प्रमाणपत्र कोर्स. हा कोर्स पदवी पर्यत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालविला जातो. याचा कालावधी तीन महिन्यांचा आहे.

२) पर्यावरण शास्त्रातील पूर्वाभिमुख कोर्स एक आठवडा कालावधीचा असून या कोर्सचा अभ्यासक्रम विशेषत्वाने शिक्षक, शिक्षणशास्त्रातील पदविका घेणारे विद्यार्थी, शेतकरी, स्त्रिया यांच्यासाठी बनविला आहे. दोन्ही अभ्यासक्रम चालविण्यासाठी प्रतिष्ठानकडे कोणतीही इमारत नसताना विद्यापीठाने तत्कालीन कुलगुरू श्री. के. बी. पवार यांनी मान्यता दिली. हा प्रतिष्ठानच्या कार्यावर दाखविलेला विश्वास प्रतिष्ठानने सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.


निसर्गशास्त्र, पर्यावरणाशी संबधित अनेक पुस्तके, नियतकालिके, असलेले एक सुसज्ज ग्रंथालय प्रतिष्ठानने चालविले आहे. निसर्ग संतुलन व शेती हे पुस्तकही प्रसिध्द केले आहे.


पर्यावरण रक्षणासाठी प्रवृक्षकृती योजना - ली पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व लोकांना प्रवृत्त करण्यासाठी केवळ व्याख्याने व प्रदर्शने आयोजित करण्यावरच न थांबता प्रतिष्ठानने पडीक जमिनीमध्ये वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रणासाठी वाहन तपासणी शिबीरे, जंगल व वन्यजीव यांचे सर्वेक्षण, गांडूळ शेती असे उपक्रम राबविले आहेत.


प्रिय व्यक्तीच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यासाठी स्मृतीवृक्ष उद्यान, निसर्ग शेतीचा नमुना असलेले निसर्गवैभव वनौषधी उद्यान, क्रांती स्मृतीवन प्रतिष्ठानने उभारलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रतिष्ठानने आपले वेगळेपण सिध्द केले आहे .


प्रतिष्ठानने उभारलेल्या पर्यावरण चळवळी - ली आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ अशा वृक्षांनी समृद्ध असलेल्या सांगलीच्या आमराईमध्ये सांगली नगरपालिकेने प्राणिसंग्रहालय उभारण्याचा केलेला प्रयत्न प्रतिष्ठानने हाणून पाडला.

 

या प्राणिसंग्रहालयाच्या उभारणीमुळे आमराईचे मोठे नुकसान होणार होते. येथील वृक्षांना हानी पोहोचू नये, म्हणून प्रतिष्ठानने याला कडवा विरोध केला. गणेश मूर्तींचे नदीत होणारे विसर्जन थांबविण्यासाठी गेल्या वर्षी एक व्यापक मोहीम प्रतिष्ठानने राबविली होती. याला जनतेकडून चांगला प्रतिसादही मिळाला होता. जवळजवळ ८०% लोकंानी प्रतिसाद दिल्याचे डॉ. व्होरा यांनी सांगितले. यंदाही जनतेकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निसर्गभूषण पुरस्कार - ली निसर्ग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी खालील क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. १) निसर्ग किंवा संतुलित शेती २) प्रदूषण नियंत्रण व निराकरण ३) ऊर्जा बचत किंवा अपारंपारिक ऊर्जेचा वापर ४) वन्य जीवन संरक्षण ५) वनसंवर्धन किंवा पडीक भूमी विकास ६) पर्यावरण शिक्षण/साहित्य .
निसर्ग पुरस्कारासाठी सुरवात १९८३ साली झाली. पहिला पुरस्कार जेष्ठ निसर्गप्रेमी भास्करभाई सावे यांना तर दुसरा निसर्गभूषण पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना १९९४ साली देण्यात आला.