Who's Online

We have 25 guests and no members online

Download Newsletter

पारंपरिक व प्रगत शेती - डॉ. प्र. शं. ठाकूर

१. पारंपारिक शेतीचे स्वरूप :-
पारंपारिक शेती ही लाकडी अवजारे व बैल यांच्या सहाय्याने केली जात होती. पावसावर विसंबून असणाऱ्या या शेतीमध्ये खत म्हणून नैसर्गिक पालापाचेाळा, जनावरांचे मलमूत्र याचा वापर होत असे. हे त्या काळच्या प्रचलित पौर्वात्य संस्कृतीला धरून होते. बागायत शेती चुकून कोठे विहीर ओढ्यावर पाणी फेकून होई, पण मिळेल तेवढेच उत्पन्न घेणे हाच शेतीचा आशय होता. लोकसंख्या कमी असल्याने गरजा भागत असत.

२. आधुनिक शेतीचे क्रांतिपर्व :-
शेतीपध्दतीमध्ये बदल हा १९१८ च्या सुमारास दुसऱ्या महायुध्दानंतर ब्रिटिश साम्राज्य काळात घडू लागला. इंग्लडमधील शेतीसुधारणेचे प्रयोग मंदगतीने देशात आणले गेले. १९३० च्या सुमारास शेतीमध्ये लोखंडी अवजारे आली. किर्लोस्करांच्या लोखंडी नांगराने शेतीमध्ये क्रांती झाली. लोखंडी नांगराच्या वापरामुळे जमीन खोलवर चिरली जाऊन खालील माती फिरवून वरती येऊ लागली. त्यामुळे जमिनीचा पोत दरवर्षी तोडला जाऊन मातीचे फूल खाली जाऊ लागले. मातीच्या सर्व थरांमधील अन्नांश वापरला जाऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. मोटे ऐवजी रहाट आले. बागायती शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. हा काळ शेतीचे क्रांतीपर्व म्हणून ओळखला जाऊ लागला.

३. अधिक धान्य पिकवा मोहिम :-
सन १९३९ मध्ये दुसरे महायुध्द सुरू झाले आणि त्यावेळच्या इंग्रज सरकारने देशात अधिक धान्य पिकवा ही मोहिम सुरू केली. बी-बियाणे, खते या बाबत नवीन कार्यक्रम आला. मानवी मलमूत्राचा सेंद्रिय खद म्हणून वापर करणे, कचऱ्यापासून कंपोस्ट खत करणे, काही प्रमाणात रासायनिक खताचा वापर करणे या नवीन गोष्टींची सुरवात झाली.

४. ऑईल इंजिनमूळे उपसा जलसिंचन :-
रहाटऐवजी ऑईल इंजिन आले आणि पाण्याचा वापर वाढला, बागायत वाढली, जास्त उत्पादन मिळविण्याचा हव्यास वाढला. पाण्याचा अतिवापर होऊ लागला. उत्पादन वाढून मोहिमेचे यश पदरी पडले पण दूरगामी दुष्परिणाम त्यावेळी लक्षात आले नाहित. कारण त्यावेळी शेती कॉलेजे जरी असली तरी कृषि विद्यापिठे किंवा स्थानिक संशेाधन असा प्रकार नव्हता. मुख्य म्हणजे शेतकऱ्याचे थोडे मार्गदर्शन घेणे या पलीकडे शेती संशेाधनाचा फारसा संबंधच नव्हता. अर्धवट सुधारणा झालेला हा देशातील शेतीव्यवसाय देशाला १९४७ साली स्वातंत्र मिेळे पर्यत हळुहळू बदलत सुरू होता.

स्वातंत्र्योत्तर क्रांतिकाळ - स्वातंत्र्यानंतर देशापुढे वाढती लेाकसंख्या, खिळखिळी झालेली विसंबित अर्थव्यवस्था, शेती खर्चात वाढ व त्या मानाने कमी उत्पादन अशा अनेक समस्या उभ्या होत्या.

विकासाच्या दृष्टीने १९५२ ते ५७ अशी पहिली पंचवार्षिक योजना व त्यापुढे १९५८ ते १९६२ अशी दुसरी पंचवार्षिक योजना राबविण्यात आली. पण त्यामध्ये शेतीला प्राधान्य दिले नव्हते. मात्र तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून शेती मध्ये हरित क्रांतीची बीजे पेरली गेली. रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणांत सुरू झाला. अधिक उत्पादन देणारी संकरित बी-बियाणे आली, त्यांच्या उपजत कमी असणाऱ्या राग प्रतिकार शक्तीमुळे औषधांचा मारा चालू झाला. वाढत्या लोकसंख्येची अन्न धान्याची गरज भागविणे तातडीचे असल्याने त्या वेळी गत्यंतर नव्हते. देशात शेती विद्यापीठे स्थापन होऊन नवीन प्रयोग नवीन ज्ञान, शेतीमध्ये उतरले. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

५. शेतजमिनीची अधोगती :-
उत्पादनाच्या .हव्यासापोटी रासायनिक खते ,पाणी याचा बेछूट वापर होवून शेत जमिनीत अनैसर्गिक ढवळाढवळ झाली. खते, औषधे, साधने, संरक्षण यांचा खर्च वाढला.शेतीचा समतोल गेला आणि शेतजमीन निकृष्ठ अवस्थेकडे जाऊ लागली. फायदे आणि तोटे याचा दूरगामी विचार न होता पारतंत्र्याच्या काळात सुरू झालेला शेती सुधार कार्यक्रम स्वातंत्र्यानंतर तसाच पुढे रेटला गेला आणि पारंपारिक शेत पध्दतीत शेती जमीन नैसर्गिक शेतीचा विचार करण्यास आपणास भाग पाडत आहेत.

६. प्रगत शेतीचे रूप :-
आजच्या प्रगत शेतीचे रूप कसे आहे हे पाहणे आवश्यक आहे. निसर्गावर अवलंबून नराहता कृत्रिम पध्दतीने नियंत्रण ठेवून शेती करणे., उत्पादनात फार मोठी म्हणजे ८०० ते १००० पटीने वाढ करणे, त्यासाठी पॉलीहाऊस अथवा ग्रीन हाऊस निर्माण करणे ,प्लॅस्टिकच्या छताचा वापर ,आच्छादित उष्णता,आद्रता, रोगविरहित वातावरण निर्माण करणे ,पानांच्या वाढीवर नियंत्रण ठेवून सर्व शक्ति धान्य फळे याकडे वळविणे असे तंत्र प्रगतशेतीत वापरले जात आहे, मातीविना शेतीचे प्रयेागही होत आहेत. यासाठी अनेक साधने आणि मोठी उर्जा लागते. बायोटेक्निक तंत्र वापरून पिकांच्या नवीन जाती, बियाणे याचा पुरवठा ,विकसनशील देशाना होईल पण प्रगत दुसऱ्या देशावर विसंबून रहावे लागेल. आपल्या सारख्या देशात हे प्रयेाग सद्यस्थितीत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे प्रगतिशील शेती कशी करावीहा प्रश्न आपणच सोडवावा लागेल.

ज्ञान परदेशी - तंत्र परदेशी ।
अंध होता फसशी - स्वातंत्र्य गमवशी । शोध स्वत:चा मार्ग - बांध स्वत:चा दुर्ग । स्वावलंबन, स्वदेशी - स्वर्ग आणिल या देशी ।।