Who's Online

We have 146 guests and no members online

Download Newsletter

निसर्गशेती - डॉ. रविंद्र व्होरा

१. शाप की वरदान ?

वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाचा प्रश्न काही प्रमाणात आधुनिक शेतीमुळे सुटला हे जरी खरे असले तरी त्या पाठोपाठ पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम होऊन मानवाचे शारिरीक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ बिघडले. भावी पिढ्याना मोठ्या आपत्तीना तोंड द्यावे लागणार आहे. यांत्रिक नांगरट, संकरित बियाणे, रासायनिक खते, कीड नाशके, मोठे जलसिंचन, नगदी पिके इ. मुळे निसर्गाचे नियम तोडले गेले. धरणीला न देता घेतलेल्या उत्पन्ना मुूळे माती, पाणी, हवामान, वनस्पतींच्या जाती, सूक्ष जिवाणू, उपयुक्त किटक, पक्षी, यांची हानी होऊन पर्यावरण संतुलन बिघडले. पीक उत्पादनही घसरले.


२. मानवी आरोग्यावर परिणाम

(अ) कीडनाशकाचा दुष्परिणाम :- पिकावर वापरलेल्या कीडनाशकापैकी फक्त १-२ टक्के कामी येते. बाकी ९८ टक्के विषारी घटक अन्न शंृखलेव्दारा मानवी शरीरात प्रवेश करतात. धान्य, भाजीपाला, फळे, बाधित चारा खालेल्या जनावरंाचे दूध, प्रदूषित पाण्यातील मासे, मांस, अंडी, श्वसन क्रिया यामधून विषारी द्रव्यांचा थोडा डोस रोज पोटात जातो. आईच्या अंगावरील दूधात देखील डि.डि.टी. / बी.एच.सी. यांचे प्रमाण सध्या प्रमाणापेक्षा पाच पट आढळले. अन्न पदार्थात सध्या प्रमाणापेक्षा विषारी घटक ३० टक्के अधिक आढळले. शरिरात घुसलेले हे विषारी घटक रक्तात मिसळतात. त्याचे विघटन करून बाहेर टाकण्याची क्षमता मानवी शरिरात नसल्याने चरबी व पेशीमध्ये ते साठतात. परिणामी मुत्रपिंड, लिव्हर, हृदय, स्तन, अंडकोष, अशा इंद्रियांचे विकार उद्भवतात. मेंदू, चेतासंस्था यावर परिणाम होवून अंधत्व, पक्षघात, निद्रानाश, वंध्यत्व आणि मानसिक विकार होतात. लहान मुलांना अपंगत्व येते किंवा वाढ खुंटते. मुलांचे आणि स्तनांचे क्रॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्नत जिथे फवारणीच्या वेळी सर्व दक्षता घेतली जाते. कीड नाशकामुळे प्रतिवर्षी ६००० लोकांना क्रॅन्सर होतो. आपल्या देशात ७० टक्के किटकनाशके जास्त अपायकारक आहेत. यामुळे त्वचेची अॅलर्जी, फुप्फुसाचे विकार, गर्भदोष, गर्भपात, जन्मजात व्यंग असे अनेक विकार कीडनाशकाचे विषारी घटक शरिरात साठल्याने होतात. अपघातीसेवनाने दरवर्षी १५ ते २० हजार लोकांना बाधा होते आणि त्यापैकी १/३ लोक मृत्यूमूूखी पडतात. भोपाळच्या युनियन कार्बाईडचे २५०० लोकांचा बळी घेणारे आणि ५० हजार लोक व्याधग्रिस्त क रणारे उदाहरण आपल्या समोर आहेच.

(ब) रासायनिक खतांचे दुष्परिणाम :- पिकांना दिलेल्या रासायनिक खतापैकी फार थोडा भाग वापरला जातो. बाकी भागातील सोडीयम नायट्न्ेटस, क्रॅडमियम, आर्सेनिक इत्यादि प्रदूषके पाण्याबरोबर वाहून जाऊन जलाशय प्रदूषित करतात. कीडनाशकातील मर्क्युरी, मँगॅनिज, शिसे, निकेल इत्यादी अपायकारक घटक जमीन आणि पाणी प्रदूषित करत असतात. असे पाणी पिल्यामुळे मुत्रपिंड आणि श्वासनलिकेचे विकार होतात. नंपुसकत्व येऊ शकते. मुलांच्यात मतीमंदता येते. किंवा क्रॅन्सर होऊ शकतो.

३. इतर प्राणिमात्रावरील दुष्परिणाम : लीमानवाप्रमाणे इतर प्राणीही यातून सुटू शकत नाहीत. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणू, गांडूळ याचेवर खत आणि कीड नाशकांचा प्रतिकूल परिणाम होतो. मित्र किटकही मरतात आणि उलट प्रतिकार शक्ती असलेल्या किडीच्या नव्या जाती निर्माण होतात. खेकडे, मासे, पक्षी, यांचाही बळी जातो. शेळया, मेंढ्या, कांेबड्या, जनावरांचे दूध यामध्ये विषारी घटक वाढतात. अन्न बेचव तर होतेच. पण त्या बरोबर काही संकरित जाती कमी पौष्टिक असतात.

४. व्यापारी घातक पिके : लीपैशाच्या आशेने प्रगत देशांचे अनुकरण करून चहा, कॉफी, कोको, साखर या सारख्या अनावश्यक परंतू जिभेचे चोचले पुरवणारी उत्पादने घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल होत आहे. आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही दृष्टिंनी हे हानीकारक आहे.

५. बेसुमार खर्च : लीनगदी पिकासाठी बियाणे, खते, कीडनाशके, मोठी ऊर्जा यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांना परावलंबीपणा आणि कर्जबाजारीपणा आला. सेंद्रिय खते आणि उपयुक्त स्थानिक जाती वापरणारा स्वतंत्र शेतकरी, व्यापारीवृत्तीच्या बहुउद्देशिय कंपन्यांच्या विळख्यात सापडून परावलंबी होऊ लागला आहे.

६. ग्रामीण अर्थ व्यवस्था ढासळली : लीकर्जबाजारी शेतकरी नोकरीच्या शोधात स्थलांतरीत होतो. यामुळे शहरी समस्या वाढतात. व ग्रामीण भागात निर्मित क्षमता घटते. फायदा होतो तो श्रीमंत मोठ्या शेतकऱ्यांचा किंवा मोठ्या बहुऊद्देशिय कंपन्यांचा ! शेतीची शाश्वतता आणि पुनर्निमित क्षमता ऱ्हास पाऊ लागली तर ग्रामीण क्षेत्राची अर्थव्यवस्था कोलमडते. जीवनावश्यक वस्तंूची आयात करावी लागते. वाहतूकीसाठी उर्जा खर्च होतो. या उधळपट्टीची किंमत पुढील अश्राप पिढ्यांना भोगावी लागते. प्रदूषित पाणी, जंगलतोड यामुळे येणारी रोगराई याचा परिणाम ग्रामीण समाज जीवनावर होतो. आदिवासी, विमुक्त जाती, कोरडवाहू अल्पभूधारक यांच्या कुटुंबातील स्त्रियांच्या समस्या आणि कष्ट वाढले.

७. स्त्रियांच्या समस्या : लीलहान शेतकरी हरितक्रांतीच्या फायद्यापासून वंचित राहिला. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण रोजगार बुडला. परिसरातील साधनसामुग्री वापरून पर्यावरणाशी सुसंवाद साधून गुजराण करू शकणारे शेतकरी कुटुंब दारिद्र्यामूळे उरल्या सुरल्या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर जगण्यासाठी करू लागले. परिणामी नैसर्गिक असंतुलन वाढले. पुरूष रोजगारासाठी स्थलांतरीत झाले. स्त्रियांच्या नशिबी अपरिमित कष्ट आले. वास्तविक ग्रामिण स्त्रिया हा शेतीचा मूळ आधार आहे. आता यांत्रिकरण, तणनाशक औषधे यामुळे खुरपणीची पोटभर कामे स्त्रियांना मिळत नाहीत. महागाई वाढली. संसार ओढण्याची पाळी स्त्रियांवर आली.

८. सूवर्णमध्य साधा : ली१९५० ते ६० च्या तूलनेत पुढील दोन दशकात लोकसंख्येच्या प्रमाणात शेती उत्पादन वाढत नाही. यासाठी निसर्ग, शेती आणि मानवी गरजा यांचा सखोल अभ्यास करून पारंपारीक शेती, नैसर्गिक शेती आणि नवीन शेती विज्ञान यांची सांगड घालणे क्रमप्रात्प आहे. यातून निर्माण होणारी शेती निसर्गाशी संतुलित असेल, शाश्वत असेल, आणि समृध्दही असेल.

नको विषाची परीक्षा ।
करा अरोग्याची रक्षा ।
अती हव्यास करी शोषण ।

मित्र निसर्ग करी पोषण ।।
किटकनाशक खत रसायन ।

शेती जमिनीचा शत्रू जाण ।
शेती संतुलीत सहजीवन ।

समृध्दीचे शाश्वत संजीवन ।।