Who's Online

We have 46 guests and no members online

Download Newsletter

माजी विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी वाटणारी आत्मियता ही शिक्षक आणि सहकारी मित्रपरिवार यातूनच वृद्धिंगत झालेली असते. कॉलेज शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यावर हा मित्रपरिवार विखुरला जातो. नोकरी वा व्यवसायातील यशासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक असते. माजी विद्यार्थ्यांच्या या गरजेकडे लक्ष दिले जात नाही. निवृत्त शिक्षकही विद्यार्थ्यांपासून दुरावले गेल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा माजी विद्यार्थ्यांना मिळणे दुरापास्त होते.

वालचंदच्या माजी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने याच उद्देशाने संकेतस्थळ कार्यरत ठेवण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. आर्थिक नुकसान सोसून संस्थेने हा धाडसी पण हितकारक निर्णय घेतला याबद्दल संस्थेच्या विश्वस्तांचे अभिनंदन. ज्ञानदीप फौंडेशनच्या वालचंद हेरिटेज प्रकल्पामध्ये माजी विद्यार्य़ी, माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची जमा केलेली माहिती, वालचंद कॉलेजच्या प्रगतीचा इतिहास तसेच भावी योजना यांची माहिती या संकेतस्थळावर राहणार आहे. वालचंद माजी विद्यार्थी संघटनेचा वा वालचंद कॉलेजच्या अधिकृत माजी विद्यार्थी वेबसाईटचा या संकेतस्थळाशी कोणताही संबंध नाही. या संकेतस्थळासाठी कोणतेही प्रवेश मूल्य वा सदस्यता वर्गणी नाही. या संकेतस्थळावर माजी विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसाय वा उद्योगाच्या जाहिराती सशुल्क प्रसिद्ध करता येतील. मात्र कोणतेही कारण न देता जाहिरात वा मजकूर प्रसिद्ध करणे वा न करणे हा अधिकार ज्ञानदीप फौंडेशन स्वतःकडे सुरक्षित ठेवीत आहे.

Visit website - Walchandalumni.com

वालचंद कॉलेजच्या निवॄत्त प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचा रॊप्य महोत्सव दिनांक २९ जून २०१८ रोजी श्री. गणपतीमंदिरानजिकच्या हेरंब मंगल कार्यालयात संपन्न झाला. सांगलीचे राजेसाहेब श्री. विजयसिंह पटवर्धन यांना काही महत्वाच्या कामामुळे परगावी जावे लागले यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश, त्यांच्या संगीतमय प्रवासाविषयीची सीडी व आपले प्रतिनिधी यांना पाठविले होते.

प्रा. तलाठी
प्रा. तलाठी बिल्डींग कन्स्ट्रक्शन शिकवायचे. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्त्यांनी कॉलेजमध्ये चुना तयार करण्यची भट्टी बांधली होती.

वालचंद इनोव्हेशन या ज्ञानदीपच्या प्रकल्पात वालचंद कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापकांच्या कार्याची माहिती संकलित करण्याचे मी ठरविले आणि निवृत्त प्राध्यापकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर सर्वांना आपली माहिती पाठविण्याचे आवाहन केले. माझी अपेक्षा होती की सर्वजण या कल्पनेचे स्वागत करतील व आपली माहिती पाठवतील.

आमच्या सिव्हील डिपार्टमेंटमध्ये रुजू झालेले बहुतेक प्राध्यापक बाहेर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन आले होते. आमचे विभागप्रमुख प्रा. म. अ. ब्रह्मनाळकर पूर्वी गुजराथमधील उकाई धरणावर इंजिनिअर होते. प्रा. बर्वे व प्रा. गोळे मिलिटरीतून, प्रा. सखदेव आणि प्रा. तलाठी इरिगेशन डिपार्टमेंटमधून, प्रा. शिरहट्टी पुण्याच्या cwprs मधून, प्रा. रानडे व जोगळेकर कंस्ट्रक्शन क्षेत्रातून आले होते. साहजिकच त्यांच्या अनुबवाचा फायदा विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हा अननुभवी शिक्षकांनाही होत असे. दुपारचा डबा खाण्यासाठी आम्ही एकत्र बसत असू. त्यावेळी मेकॅनिकलचे प्रा बाम व इलेक्ट्रिकलचे प्रा. सी. जी. जोशीही येत. त्यांच्या गप्पा ऐकताना आम्हाला बाहेरच्या प्रत्यक्ष कामांची माहिती कळे.