Who's Online

We have 6 guests and no members online

Download Newsletter

स्नेहदीप, आंबेडकर रोड, सांगली येथे राहणा-या सौ. साक्षी सचिन गद्रे यांनी आपला संसार सांभाळून इडली सेंटर सुरू केले. त्यांचे पती श्री. सचिन गद्रे यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य देऊन हा व्यवसाय सांगलीतील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचविला. या दोघांची मुलाखत ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांनी घेतली आहे. सौ. साक्षी गद्रे व सचिन गद्रे यांचे ज्ञानदीपतर्फे अभिनंदन.

जीवनाच्या सर्व क्षेत्रात सध्या पुरुषांचे वर्चस्व आहे. महिला पुरुषांइतक्याच कर्तबगार असल्या तरी त्यांना कौटुंबिक जबाबदा-यांमुळे घर सांभाळावे लागते. मुलांचे संगोपन करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीवर नैसर्गिक व परिस्थितीची बंधने पडतात.

सुदैवाने सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात महिलांना आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदा-या सांभाळून घरबसल्या इंटरनेटच्या साहाय्याने नोकरी, व्यवसाय करणे शक्य झाले असून आपल्या कलागुणांना वाव देऊन सामाजिक व शैक्षणिक कार्यातही महत्वाचे योगदान देता येऊ लागले आहे.

ज्ञानदीपच्या संचालिका कै. सौ. शुभांगी रानडे यांनी संस्कृत शिक्षिका असूनही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये प्राविण्य मिळवून संगणक प्रशिक्षण तसेच मराठी माध्यमातून वेबसाईट आणि सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

या कार्याचा मागोवा घेऊन असे कार्य पुढेही चालू रहावे या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फौंडेशनने ज्ञानदीप महिला मंडळ या नावाचे केवळ महिलांसाठी एक इंटरनेट आधारित व्यासपीठ सुरू केले आहे व त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्ञानदीप फौंडेशनच्या विश्वस्त प्रा. सौ. सरोज गोळे यांचेकडे सोपविली आहे.

सांगलीतील इंग्रजीच्या ज्येष्ठ प्राध्यापिका सौ. राजलक्ष्मी बर्वे (माहेरचे नाव – भारती करंदीकर) या ज्ञानदीपच्या डॉ. सु वि. रानडे यांना गेली अनेक वर्षे परिचित असून त्यांचे वडील हे सातारला त्यांचे शिक्षक होते. सौ. बर्वे लहानपणापासून अत्यंत हुशार व साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहे.सांगली आकाशवाणीवर त्यानी काही काळ निवेदिका म्हणून काम केले असून अनेक संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. सध्या त्या स्पोकन इंग्लिशचे ऑनलाईन शिक्षणवर्ग घेत आहेत. त्यांची मुलाखत.

वालचंद कॉलेज, सांगलीचे निवृत्त प्रा. एच. युय कुलकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुधाताई कुलकर्णी यांनी आपल्या जीवनाचा थोडक्यात करून दिलेला परिचय.

त्यांच्या संगीतावर त्यांची मुलगी सौ. जयंती जोशी, सॅनओसे, कॅलिफोर्निया यांनी तयार केलेला व्हिडीओ
All the flower arrangements are made by Sou. Sudha Kulkarni.